वाढदिवसाचा खर्च टाळून शिदवाडीच्या निराधार, दिव्यांग शेतकऱ्यांना भाताचे बियाणे वाटप : बाजार समिती संचालक दिलीप चौधरी यांचा स्तुत्य उपक्रम

इगतपुरीनामा न्यूज – घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा उपसरपंच दिलीप चौधरी यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून इगतपुरी तालुक्यातील खंबाळे हद्धीतील आदिवासीबहुल असणाऱ्या शिदवाडी येथे निराधार दिव्यांग शेतकऱ्यांना भाताचे बियाणे वाटप केले. यावेळी ह्या शेतकऱ्यांनी दिलीप चौधरी यांना आशीर्वाद देऊन कृतज्ञता व्यक्त केली. खंबाळे येथे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पीडित महिलेचा दुखवटा पाळून वाढदिवस साजरा न करण्याचे दिलीप चौधरी यांनी ठरवले आहे. मात्र जन्मदिनासाठी होणारा सर्व खर्च समाजोपयोगी कार्याला खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिदवाडी येथील आदिवासी निराधार कुटुंबातील संगीता अमृता ठाकरे, संगीता मनु ठाकरे, दिव्यांग असलेले शंकर देवराम ठाकरे ह्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. ह्या खरीप हंगामात भातशेती करण्यासाठी बियाणे नसल्याने ते चिंताग्रस्त होते. ही बाब उपसरपंच दिलीप चौधरी यांना समजताच त्यांनी बियाण्यांची मदत करण्याचे ठरवले. त्यानुसार आज भात बियाणे वाटप करण्यात आले. वाढदिवसाच्यानिमित्ताने गोरगरिबांना मदत केल्याबद्दल दिलीप चौधरी यांचे कौतुक होत आहे. यावेळी सरपंच कैलास शिद, ग्रामपंचायत सदस्य उत्तम पारधी, प्रहार सेवक सपन परदेशी, आनंदा शिद, सावळीराम शिद, रावजी बाबा शिद, भगवान खडके, काळु शिद, हरी मेंगाळ, समाधान शिंगोटे, विठ्ठल शिंगोटे आदी उपस्थित होते.

Similar Posts

error: Content is protected !!