इगतपुरी तालुक्यातील कानडवाडी येथील बालिकेवर बिबट्याचा हल्ला

इगतपुरीनामा न्यूज, दि. २३

इगतपुरी तालुक्यातील कानडवाडी येथील ३ वर्षीय बालिका गौरी गुरुनाथ खडके हिच्यावर दि. २२ च्या रात्री घरच्या दारा जवळ आईच्या शेजारी बसली असताना अचानक बिबटयाने  हल्ला केला. तिला जंगलाच्या दिशेने ओढून नेले. ही सर्व घटना मुलीचे आईवडील, आजोबा यांच्या समक्ष घडली असता त्यांनी आरडा ओरडा केला. पाठलाग केल्याने बिबट्याने काही अंतरावर गुरतुलेच्या झुडपात बालिकेला सोडून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. ही घटना समजताच इगतपुरी वन क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. काही ग्रामस्थांनी व कर्मचारी यांनी तात्काळ घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून प्रथमोपचार घेऊन वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र बालिकेचा मृत्यू झाला.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!