इगतपुरी तहसील कार्यालयाच्या वक्तृत्व स्पर्धेत मुंढेगावची वैष्णवी गतीर प्रथम

इगतपुरीनामा न्यूज, दि. १५

इगतपुरी तहसीलदार कार्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने घेतलेल्या विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट सादरीकरण केलेल्या विद्यार्थ्यांना तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंढेगाव येथील शिक्षिका विमल कुमावत यांची विद्यार्थिनी वैष्णवी कल्पेश गतीर हिला वक्तृत्व स्पर्धेतील प्रथम पारितोषिक मिळाले.

याप्रसंगी उपस्थितांच्या अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात योगदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना वैष्णवीने सर्व साक्षीने जणू मानवंदनाच दिली. टाळ्यांच्या प्रचंड गजरात सर्व उपस्थित अधिकारी, स्वातंत्र सैनिक यांनी तिचे भरभरून कौतुक केले. तिला बक्षिस देऊन सेल्फी काढली. यावेळी तहसीलदार परमेश्वर कासुळे साहेब, नायब तहसीलदार, स्वातंत्र्य सैनिक, राष्ट्रपती पुरस्कार विजेते अशोक कुमावत, रेखा शेवाळे, वडील कल्पेश गतीर, आई लक्ष्मीबाई गतीर, पुंजाराम हिरे आदी उपस्थित होते. वैष्णवीच्या यशाबद्दल तिचे तालुकाभर कौतुक होत आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!