वॉक अ थॉन व योगा कार्यक्रमात नवजीवन विधी महाविद्यालयाचा सहभाग

इगतपुरीनामा न्यूज, दि. १५

‘आझादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमांतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय, भारत सरकार आणि जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या  सहकार्याने “वॉक अ थॉन व योगा” कार्यक्रम संपन्न झाला. नवजीवन विधी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी एनएसएस समन्वयक प्रा. शालिनी पेखळे यांच्या नेतृत्वाखाली उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमासाठी प्राचार्या डॉ. शाहिस्ता इनामदार यांनी विशेष पुढाकार घेऊन कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

याप्रसंगी प्रा. मकरंद पांडे, प्रा. डॉ. समीर चव्हाण, प्रा. डॉ. प्रज्ञा सावरकर, प्रा. स्वप्नील पवार, प्रा. मिनाक्षी जाधव, प्रा. प्रिया घोरपडे, प्रा. वैष्णवी कोकणे, प्रा. जीवन वाघ, ग्रंथपाल मंगल पाटील, हर्षल आनेराव, अतुल उंबरकर, अलका लोखंडे, घनश्याम कांबळे, विश्वास शेळके आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. याप्रसंगी अनिल देशमुख, महेंद्र विंचूरकर, मंगला पवार यांचे सहकार्य लाभले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!