इगतपुरीनामा न्यूज, दि. 27
आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 29 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. इगतपुरी तालुक्यात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. दिवसभरात 45 नवे कोरोना रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आज दिवस अखेर 286 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी दिली.
उंबरकोन, धामणी, टाकेघोटी, टिटोली, मुकणे, कुऱ्हेगाव, कऱ्होळे आदी गावांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद लाभला. लस अतिशय सुरक्षित असून सर्वांनी लसीकरण करणे आवश्यक असल्याचे लस घेतलेल्या नागरिकांनी सांगितले.
सध्या कोरोनाची धास्ती सर्वांनाच आहे.. अगदी कोणतेही उपचार घ्यायची लोकांची तयारी आहे, अशा परिस्थितीत किफायतशीर दरात उपलब्ध असलेलं बर्फानी आरोग्य प्लस हे आयुर्वेदिक प्रतिबंधक औषध आहे. रुग्णांसाठी बर्फानी आरोग्य प्लस म्हणजे फक्त औषध नाही, तुमच्या प्रियजणांसाठी ते सुरक्षा कवच आहे ! 7030288008