
इगतपुरीनामा न्यूज – मंगळवारी रात्री इगतपुरीजवळ हॉटेल ड्यू ड्रॉप येथे मुक्कामाला थांबलेले हिंदी सिनेसृष्टी आणि मालिकेतले लोकप्रिय अभिनेते नितिश पांडे यांचा मृत्यू झाला आहे. ‘अनुपमा’ मालिकेत रुपाली गांगुली हिच्या मैत्रिणीच्या पतीची भूमिका साकारणाऱ्या ह्या हरहुन्नरी कलाकाराच्या निधनाने चित्रपटक्षेत्रात शोक व्यक्त होत आहे. रात्री दहाच्या सुमारास त्यांच्या रूममध्ये हॉटेल कर्मचाऱ्याने फोन करून फोनला प्रतिसाद मिळाला नाही. त्यांच्या खाजगी मोबाईलवर फोन करून त्यांनी प्रतिसाद दिला नाही. म्हणून कर्मचाऱ्याने संशय आल्याने मॅनेजर मार्फत दुसऱ्या चावीने रूमचा दरवाजा उघडला. यावेळी असता नितीश पांडे हे बेडवर बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. इगतपुरीत ते स्टोरी रायटिंगसाठी नेहमी येत असत. त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असून पुढील तपास इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे व त्यांचे कर्मचारी करीत आहेत.