प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील मुकणे येथील सागर गंगाराम राव वय ३० या युवकावर वीज पडुन तो गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. जनावरे चारत असतांना आज दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. त्याला तात्काळ वाडीवऱ्हे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सागर राव हा युवक जनावरे चारत असतांना वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरवात झाली. मात्र जवळ लपण्यासाठी जागाही नसल्याने सागर हा जनावरांजवळच असतांना वीज त्याच्यावर पडली. यात सागरचे कपडे व केस जळाले असुन पायालाही गंभीर जखमा झाल्या असुन तो गंभीररित्या भाजला आहे. घटनेचे वृत्त समजताच पाडळी फाट्यावरील युवकांनी धाव घेत सागरला तात्काळ वाडीवऱ्हे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असुन सागरवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group