कपडे धुण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेवर बलात्कार करून खुन : इगतपुरी तालुक्यातील घटनेने माजली खळबळ

इगतपुरीनामा न्यूज – खदाणीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेवर बलात्कार करून तिचा खून केल्याची गंभीर घटना घडली आहे. इगतपुरी तालुक्यातील खंबाळे येथील विश्राम गृहाच्या बाजुला असलेल्या खदाणीच्या पाण्यात आज सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास गावातील अंदाजे ४० वर्षीय महिला नेहमी प्रमाणे कपडे धुण्यासाठी गेली होती. याच वेळी येथे दबा धरूण बसलेल्या येथील इसमाने या महिले सोबत झटापटी करून २० फुट खड्डयात खाली पाडुन बलात्कार करून नंतर तिचा खून केल्याची घटना घडली आहे. ही माहिती समजताच स्थानिक नागरीक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी तेथे एक इसम मिळुन आल्याने त्याला पकडुन घोटी पोलीसांच्या ताब्यात दिले. या घटनेत तीन संशयित इसम असल्याची माहिती मिळत असुन दोघे फरार झाले आहेत.

खंबाळे येथे सार्वजनिक बांधकाम विश्रामगृहाच्या परीसरात रोजच अनेक मद्यपी दारु पिण्यासाठी बसत असल्याने जणू काही मद्यपींचा अड्डाच बनला आहे. येथे दिवसभर मद्यधुंद अवस्थेत मद्यपी वावरतांना दिसतात. मात्र याकडे कोणाचाच अंकुश नसल्याने हा प्रकार वाढतच चालला आहे. याच विश्रामगृहाच्या बाजुला असलेल्या खदाणीत ही दुर्दैवी घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून सदर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Similar Posts

error: Content is protected !!