
प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज – मुंबई आग्रा महामार्गावरील माणिकखांब जवळ मोटारसायकलला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरात धडक दिल्याने अपघात झाला. ह्या अपघातात नाशिकच्या दिशेने प्रवास करणाऱ्या पती पत्नी पैकी पत्नी जागीच ठार झाली आहे. पती गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. ही घटना आज दुपारी साडेचार वाजेच्या सुमाराला घडली. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन गंभीर जखमीला घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वनिता सोपान राव वय २३ असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. सोपान किसन राव वय २६ हा गंभीर जखमी झालेला आहे. हे दोघे मुकणे येथील रहिवासी असून गावात शोक पसरला आहे. अपघातग्रस्त मोटारसायकलचा क्रमांक MH 15 HB 5916 असा आहे. घोटी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.