इगतपुरीत रेव्ह पार्टीवर पोलीस अधिक्षकांकडून धाड मारून कारवाई

इगतपुरीनामा न्यूज, दि. २७

इगतपुरीत आज पहाटेच्या सुमारास  मानस रिसॉर्ट हद्दीतील स्काय ताज विला या बंगल्यावर रेव्ह पार्टीची गुप्त बातमी मिळताच नाशिकचे ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी धाड मारून केली कारवाई केली.

स्काय ताज विलामध्ये रेव्ह पार्टी चालू होती. या पार्टीमध्ये फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्या 4 महिलांचा समावेश तसेच एक बिग बॉसमध्ये भाग घेतलेल्या एका महिलेचा समावेश आहे. यात दहा पुरुष व बारा महिलांचा समावेश होता. एकूण 22 जणांवर कारवाई करण्यात आली. ह्याबाबत पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते.

अधिक माहिती अशी की,

दक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील महिलांसह काही तरुणांना रेव्ह पार्टी करताना ग्रामीण पोलिसांनी रंगेहात पकडून अटक केल्याची घटना इगतपुरी ( Igatpuri ) येथे घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई आग्रा महामार्गावरील ( Mumbai Agra Highway ) मानस रिसॉर्ट ( Manas Resort.) हद्दीतील स्काय ताज येथील एका बंगल्यात रेव्ह पार्टी सुरू असल्याची गोपनीय माहिती नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील ( Sachin Patil ) यांना मिळाली.

यावरून त्यांनी पहाटेच्या समयी पथकासह सदर बंगल्यावर छापा मारला असता, मादक द्रव्यासह बिभत्स अवस्थेत 10 पुरुष आणि 12 महिला आढळून आल्या. यातील ४ महिला ह्या दक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील ( South Film Industry) काम करणाऱ्या आहेत व 1 महिलेने बिग बॉस ( Big Boss ) या शोमध्ये काम केले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

यावेळी पोलिसांनी घटनास्थळहून कॅमेरा, ट्राय पॉड, सह मादक द्रव्य जप्त केली. ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील, ग्रामीण महिला पोलिस अधीक्षक शर्मिला वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक अर्जुन भोसले, इंगतपुरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक समाधान नागरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील, लोहरे, वैभव वाणी, मुकेश महिरे, राज चौधरी, शरीफ शेख यांनी यशस्वीरित्या राबविली.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!