
इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघ मर्या नाशिक ह्या संस्थेच्या संचालकपदी काँग्रेस नेते ॲड. संदीप गोपाळराव गुळवे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सलग दुसऱ्यांदा त्यांची ह्या संस्थेवर निवड झाली आहे. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे इगतपुरी तालुका संचालक आणि अनेक संस्थांवर विविध पदे ते भूषवत आहेत. नुकत्याच झालेल्या घोटी बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत ॲड. संदीप गुळवे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने बहुमत मिळवलेले आहे. त्यांच्या बिनविरोध निवडीचे इगतपुरी तालुक्यात स्वागत करण्यात येत असून विविध पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.