राज्याची सर्वांगीण उन्नती व समृद्धीमध्ये सिंहाचा वाटा असणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दाहक निर्णय मागे घ्यावा : नाशिक जिल्ह्यातर्फे गोरख बोडके, शिवराम झोले यांची मुंबईत मागणी

इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्राच्या सर्वांगीण उन्नती आणि समृद्धीमध्ये सिंहाचा वाटा असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची निवृत्ती अतिशय वेदनादायी आहे. ह्या देशाला त्यांच्यासारख्या महाकाय व्यक्तीमत्वाची खऱ्या अर्थाने सध्याच्या काळात आवश्यकता आहे. नाशिक जिल्ह्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून शरद पवार हे कायम ह्या पदावर असावेत अशी भावना आहे. म्हणून पवार साहेबांनी  घेतलेला निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी आग्रही मागणी नाशिकचे जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांनी नाशिक जिल्ह्यातर्फे मांडली. मुंबई येथे शरद पवार यांनी घेतला असलेला निर्णय मागे घ्यावा यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी एकत्र आले होते. यावेळी गोरख बोडके यांनी शरद पवार यांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. इगतपुरीचे माजी आमदार शिवराम झोले यांनीही यावेळी आपले प्रभावी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रियाताई सुळे आणि राज्यभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते.

इगतपुरी आणि घोटी मध्ये हाय स्पीड इंटरनेट, वायफाय सेवा

संपर्क साधा - स्पीडनेट इंटरनेट सोल्यूशन्स - 9422214143

Similar Posts

error: Content is protected !!