बेलगाव कुऱ्हे, नांदूरवैद्यच्या तलाठी सुरेखा कदम नाशिक जिल्हा आदर्श तलाठी पुरस्काराने सन्मानित

इगतपुरीनामा न्यूज – गाव पातळीवर महसूल विभागाच्या माध्यमातून सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या बेलगाव कुऱ्हे, नांदूरवैद्य येथील तलाठी सुरेखा संपत कदम यांना नाशिक जिल्हा आदर्श तलाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिकचे पालकमंत्री ना. दादा भुसे यांच्या हस्ते त्यांना महाराष्ट्र दिनी सन्मानपूर्वक पुरस्काराने गौरवण्यात आले. प्रशासनाचा कणा असणाऱ्या महसूल विभागातील तलाठी गावपातळीवरील महत्वाचे अधिकारी म्हणून काम पाहतात. तलाठ्यांना प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. यावर्षीचा आदर्श तलाठी पुरस्कार सुरेखा कदम यांना मिळाला आहे. त्यांचे महसूल विभागासह विविध भागातून कौतुक होत आहे. आदर्श तलाठी पुरस्कार मिळाला असून अधिकाधिक ऊर्जा घेऊन काम करणार असल्याचे आदर्श पुरस्कार प्राप्त तलाठी सुरेखा कदम यांनी सांगितले. तहसीलदार परमेश्वर कासुळे, निवासी नायब तहसीलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारकून, तालुक्यातील मंडळ अधिकारी, तलाठी आणि शेतकऱ्यानी त्यांच्या पुरस्काराचे स्वागत केले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!