शेतकरी, कष्टकरी, वंचित आणि मजूरांच्या हितासाठी शेतकरी विकास पॅनलला निवडून द्या : एल्गार कष्टकरी संघटनेतर्फे भगवान मधे यांचा पॅनलला पाठिंबा घोषित

इगतपुरीनामा न्यूज – घोटी बाजार समिती शेतकऱ्यांची आहेच पण कष्टकरी, आदिवासी, वंचित, गोरगरीब, मजूर आणि शेतीशी संबंधित सामान्य माणसाची सुद्धा आहे. ह्या संस्थेवर लोकांच्या प्रश्नांची उत्तम जाण असणारे संचालक पाठवणे आवश्यक आहेत. लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे प्रणित शेतकरी विकास पॅनलमध्ये असलेले सर्व उमेदवार यासाठी सुयोग्य आहेत. म्हणून एल्गार कष्टकरी संघटनेचा संस्थापक ह्या नात्याने शेतकरी विकास पॅनलच्या १८ उमेदवारांच्या विजयासाठी सक्रिय पाठिंबा घोषित करीत आहे. ह्या पॅनलचा विजय निकालाच्या दिवशी साजरा करायला एल्गार कष्टकरी संघटना सहभागी होईल अशी माहिती संस्थापक अध्यक्ष भगवान मधे यांनी दिली आहे.

शेतकरी विकास पॅनलतर्फे सोसायटी गटातून निवृत्ती भिकाजी जाधव, सुनील रामचंद्र जाधव, शिवाजी लक्ष्मण शिरसाठ, हरिदास नरहरी लोहकरे, अर्जुन सयाजी पोरजे, रमेश सदाशिव जाधव, भाऊसाहेब पांडुरंग कडभाने. महिला राखीव – सुनीता संदीप गुळवे, आशा भाऊसाहेब खातळे. ओबीसी – राजाराम बाबुराव धोंगडे. व्हीजेएनटी – ज्ञानेश्वर निवृत्ती लहाने. ग्रामपंचायत गट सर्वसाधारण – अर्जुन निवृत्ती भोर, नंदलाल भाऊ भागडे. एससीएसटी – संतू नारायण साबळे. आर्थिक दुर्बल – संपत किसन वाजे. व्यापारी गट भरत सखाराम आरोटे, नंदलाल चंपालाल पिचा. हमाल तोलारी गट रमेश खंडू जाधव ह्या १८ उमेदवारांच्या कपबशी निशाणीवर मतदान करण्याचे आवाहन भगवान मधे यांनी केले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!