कोरोनामुक्त होण्याचा दिवस लवकरच

इगतपुरीनामा न्युज, दि. २८

इगतपुरी तालुक्यात कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या अत्यंत कमी होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये आशादायक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुक्तीच्या मार्गावर चांगली वाटचाल सुरू असल्याने आरोग्य यंत्रणेला सुद्धा हायसे वाटत आहे.

आज सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या शासकीय अहवालानुसार आज ३ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. दुसरीकडे आज ३ रुग्णांचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आज दिवस अखेर पर्यंत इगतपुरी तालुक्यातील उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या अवघी १० झाली आहे. इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी सांगितले की, इगतपुरी तालुक्यातून लवकरच कोरोनाचे उच्चाटन होऊन तालुका कोरोनामुक्त होणार आहे. असे असले तरीही नागरिकांनी नियमांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे.

कोरोना आजारापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आयुर्वेदिक औषधी बर्फानी आरोग्य प्लस अनेकांना उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी तसेच कोरोना झालेल्यांना त्यातून लवकर बाहेर येण्यासह कोरोना नंतरच्या त्रासातून आणि गंभीर समस्या उद्भवू न देण्यास उपयुक्त ठरू शकणारी बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषध आहे. ह्या प्रभावी औषधीसाठी जवळचे मेडिकल स्टोअर अथवा 7030288008 ह्या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!