इगतपुरीनामा न्यूज, दि. २६
साकुर सोसायटीच्या स्वीकृत संचालकांची निवड करण्यात आली आहे. समाधान गंगाधर सहाणे, पंढरीनाथ तुकाराम सगर यांना स्वीकृत संचालक म्हणून स्थान देण्यात आले. बॅंक प्रतिनिधी म्हणून किशोर हरी सहाणे आणि कायदेशीर सल्लागार म्हणून ॲड. सूर्यभान नरहरी सहाणे यांचीही वर्णी लागली आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे ग्रामस्थांनी जल्लोषात अभिनंदन केले आहे. इगतपुरी तालुक्यातील आघाडीची साकुर सोसायटी असल्याने आज झालेल्या निवडीला मोठे महत्व आहे.
निवडीच्या कार्यक्रमात सोसायटीचे चेअरमन दिनकर सुरेशराव सहाणे, व्हॉइस चेअरमन द्रोपदाबाई वामनराव सहाणे, संचालक विष्णुपंत सहाणे, भिमराज सहाणे, भारत सहाणे, खंडेराव कुकडे, रावसाहेब सहाणे, जगनराव सहाणे, तुकाराम सहाणे, सुरेश रणसुरे, त्र्यंबक आवारी, मुक्ताबाई घाडगे, किशोर सहाणे, नंदु सहाणे उपस्थित होते. माजी सभापती आनंदराव सहाणे, माजी चेअरमन जगनराव सहाणे, विष्णुपंत सहाणे, सरपंच विनोद आवारी, माजी चेअरमन मधुकर सहाणे, कचरू सहाणे, भानुदास कुकडे, शंकर सहाणे, बहीरू सहाणे, त्र्यंबक सहाणे, शिवाजी विठोबा सहाणे, माजी सरपंच सुनील सहाणे, भाऊसाहेब सहाणे, कचरू बाबा सहाणे, केरू नाना सहाणे, बाळू शेळके, शांताराम आवारी, भरत आवारी, सचिव संजय शिंदे आदी मान्यवर यावेळी हजर होते. निवडीबाबत ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला असून नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.