क्षतीग्रस्त बिटूर्लीच्या कुटुंबाला प्रभुनयन फाउंडेशनतर्फे विविध साहित्याची मदत

इगतपुरीनामा न्यूज – बिटूर्ली ता. इगतपुरी येथील भाऊ बुधा पारधी यांचे राहते घर मागील आठवड्यात आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यामुळे त्यांचे कुटुंब रस्त्यावर आले. काही दिवसातच होणाऱ्या मुलीच्या लग्नासाठी आणलेल्या साहित्याचा कोळसा झाला. या पार्श्वभूमीवर मुंबई येथील प्रभुनयन फाउंडेशनच्या वतीने बिटूर्ली येथील भाऊ बुधा पारधी यांच्या कुटुंबासाठी सामाजिक कर्तव्य म्हणून किराणा सामान, ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी इगतपुरीचे माजी नगरसेवक यशवंत दळवी, ॲड. हनुमान मराडे, प्रहार संघटनेचे सपन परदेशी, इगतपुरी येथील संदीप दगडे, विठोबा डावखर, विलास डावखर, विनोद डावखर हजर हप्ते. या सर्वांच्या प्रयत्नांनी आगबाधित कुटुंबाला केलेल्या मदतीबद्धल ग्रामस्थांनी ऋण व्यक्त केले. करण्यात आली. प्रभुनयन फाउंडेशनचे सर्वेसर्वा आनंद शेठ मवानी, नितीन शेठ मवानी, दीपा मॅडम या सर्वांचे ग्रामस्थांनी आभार मानले.

Similar Posts

error: Content is protected !!