घोटी मर्चंट बँकेच्या १३ जागांसाठी निवडणुक प्रक्रिया सुरु : २४ मे रोजी होणार मतदान

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील मोठी अर्थवाहिनी असणाऱ्या घोटी मर्चंटस को ऑप बॅंकच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी गुरुवारपासून नामनिर्देशनपत्र दाखल करायला सुरुवात झाली आहे. १३ जागांसाठी ही निवडणूक होत असून २६ एप्रिलपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील. २७ एप्रिलला छाननी, २८ एप्रिल ते १२ मे पर्यंत माघार, १५ मे ला चिन्ह वाटप, २४ मे ला मतदान आणि २५ मे ह्या दिवशी मतमोजणी करून निकाल घोषित केला जाणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून इगतपुरीच्या सहाय्यक निबंधक अर्चना सैंदाणे ह्या काम पाहत आहेत. सर्वसाधारण ८ जागा, अनुसूचित जाती/जमाती १ जागा, महिला २ जागा, ओबीसी १ जागा, व्हीजेएनटी १ जागा अशा १३ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. ही निवडणूक चूरशीची होईल असा अंदाज आहे.

Similar Posts

error: Content is protected !!