इगतपुरीनामा न्यूज – घोटी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी शेतकरी परिवर्तन पॅनलच्या १८ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. पॅनलचे नेते माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, पांडुरंग गांगड, जनार्दन माळी, रतनकुमार इचम, पांडुरंग बऱ्हे, भास्कर गुंजाळ, ॲड. एन. पी. चव्हाण यांनी ही घोषणा केली. खालीलप्रमाणे शेतकरी परिवर्तन पॅनलचे उमेदवार आहेत. सर्वसाधारण सोसायटी गटातून रमेश पाटेकर, उत्तम भोसले, उदय जाधव, रघुनाथ तोकडे, संदीप धांडे, भाऊराव जाधव, दिलीप पोटकुले, तर महिला राखीव मधून अनिता घारे, शोभा पोरजे तर इतर मागास प्रवर्गातून संपत काळे, भटक्या विमुक्त जमाती मधून छाया चव्हाण तर ग्रामपंचायत मतदार संघातून दिलीप चौधरी, ज्ञानेश्वर मोंढे, आर्थिक दुर्बल गटातून मालन वाकचौरे, अनुसूचित जमातीमध्ये मारुती आघाण तर व्यापारी मतदार संघातून मोहन चोरडिया, ज्ञानेश्वर भगत तर हमाल मापारी मतदार संघातून मनोहर किर्वे हे उमेदवार आहेत. बाजार समितीवर शेतकरी परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून सत्ता काबीज करू असा दृढ विश्वास सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. प्रचाराला आरंभ करण्यात आला असून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून परिवर्तन घडवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

