स्पर्धा परीक्षेत बुद्धिमापन चाचणीचे महत्व

र्व स्पर्धा परीक्षांमध्ये बुद्धिमापन चाचणी या घटकावर प्रश्न विचारले जातात. अनेक विद्यार्थ्यांना हा घटक अवघड जातो. याची यशस्वी तयारी कशी करावी हे सांगणारा लेख.

मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरी
उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय
संपर्क – ९८२२४७८४६३

बुद्धिमापन चाचणी
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये बुद्धिमापन चाचणी या अभ्यास घटकाला महत्त्वाचे स्थान आहे. तुमच्या कारणमीमांसा क्षमतेचा अंदाज घेणे हा या घटकाचा हेतू होय. तुम्ही किती जलद आणि अचूक विचार करू शकता हे समजण्यासाठी या चाचणीचा उपयोग होतो. वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची दृष्टी यातून मिळते.

सराव महत्वाचा
सामान्य बुद्धिमत्ता चाचणी या घटकाचा सतत सराव करणे आवश्यक आहे. हा घटक खरोखरच जेवढा आव्हानात्मक आहे. तेवढाच बुद्धिमत्तेचा चौफेर विकास करणारा आहे. चालना देणारा आहे. अचूक आणि त्वरित निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणारा आहे. या घटकातील प्रत्येक प्रकारच्या उदाहरणांचा अभ्यास करून त्यातील लॉजिक, तर्क विद्यार्थ्यांनी लक्षात घेणे आवश्यक असते.

गणितातील सामान्य क्रिया
या अभ्यास घटकावरील प्रश्न सोडविताना आपण दैनंदिन व्यवहारात ज्या गणिताच्या सामान्य क्रिया करतो, त्याच क्रिया ही उदाहरणे सोडविताना कराव्या लागतात हे लक्षात घ्या. उदा. बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार, शेकडेवारी, वर्ग, घन इत्यादी. त्यामुळे प्रश्न कसा विचारला जातो हे लक्षात घेऊन त्या प्रकारची भरपूर उदाहरणे सोडविण्याचा सराव केल्यास बुद्धिमत्ता चाचणीवरील सर्व प्रश्न सोडविता येतात.।परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना नेमका हाच अभ्यास घटक अवघड जातो व आपले विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत मागे पडतात ही वस्तुस्थिती आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी याची जाणिवपूर्वक नोंद घेणे आवश्यक आहे.

संख्यामालिका
बुद्धिमापन चाचणीतील स्पर्धा परीक्षेत विचारलेले काही प्रश्न पहा. अंकमालिका, अंक श्रेणी, संख्यामालिका, संख्याश्रेणी असे शब्द बदलून प्रश्न विचारले जातात. सर्व प्रश्न अतिशय सोपे असतात. या प्रकारचे प्रश्न आपण केव्हाच सोडविलेले नसतात म्हणून ते अवघड वाटतात.
उदा. खालील संख्यामालिका पूर्ण करा .
४५३६, ५५७२,……….,८१५७, ६९४३. यासाठी योग्य पर्याय निवडा :
०१. ६७४६
०२. ७४९३
०३. १९६४
०४. ५८४२
यात एक सिक्वेन्स असते. ती ओळखता आली की उदाहरण किती सोपे आहे ते लक्षात येते.
४५३६   ४ + ५ + ३ + ६ = १८
५५७२    ५ + ५ + ७ + २=१९
…………………………………
८१५७     ८ + १ + ५ + ७=२१
६९४३      ६ + ९ + ४ + ३=२२
     येथे मालिकेतील सर्वसंख्यांमधील अंकांची बेरीज केली. ती अनुक्रमे १८, १९, —-, २१, २२  अशी आली. म्हणजेच रिक्त जागी अशी संख्या येईल की त्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज २० आली पाहिजे आणि तो योग्य पर्याय ३ हा आहे. बघा तीन पर्यायातील संख्या १ + ९ + ६ + ४ = २० म्हणून वरील उदाहरणातील योग्य पर्याय तीन हा होय.

खूप सराव करा
विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची अजिबात भीती बाळगू नये. यात यशस्वी होण्यासाठी भरपूर सरावाची आवश्यकता आहे. हे सूत्र लक्षात ठेवा. तुम्ही किती जास्तीत जास्त उदाहरणे सोडवून सराव करतात यावर यश अवलंबून आहे याची सतत जाणीव ठेवा. येथे वेळेला खूप महत्त्व असते. काही स्पर्धा परीक्षांमध्ये ६० मिनिटात १०० प्रश्न सोडवायचे असतात. काही विद्यार्थ्यांचे २० ते २५ प्रश्न सोडवायचे राहून जातात. त्यामुळे यश मिळत नाही. थोडक्यात सराव केला तर अवघड असे काहीच नाही. तेव्हा फक्त मनाची तयारी आवश्यक आहे.
             

( लेखक इगतपुरी येथील केपीजी कॉलेजचे उपप्राचार्य असून स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थीप्रिय मार्गदर्शक आहेत. )

Similar Posts

3 Comments

  1. avatar
    विलास जोपळे says:

    स्पर्धा परीक्षा म्हटली म्हणजे…अंकगणित आणि बुद्धिमत्ता..हे विषय अनिवार्य असतात… म्हणून..परीक्षा कोणतीही असो… या..बुद्धीला..चालना.देऊनच..देणे..भाग आहे… आणि हे..आपण खूप सोप्या शब्दामध्ये..समजावून दिले ..त्या बद्दल आभार…!

  2. avatar
    प्रा. रोमा विष्णुसिंग परदेशी says:

    अतिशय महत्वाचा घटक सोप्या पद्धतीने शिकवला आहे. प्रभावी लेख आहे सर धन्यवाद 🙏🙏

Leave a Reply

error: Content is protected !!