इगतपुरीनामा न्यूज – मुंबई येथे सुरु असलेला मुंबई इंडियन्स विरुद्ध कलकत्ता दरम्यान क्रिकेट सामना पाहण्यासाठी इगतपुरीच्या दुर्गम भागातील मोडाळे गावातील ५० पेक्षा जास्त “सावित्रीच्या लेकी” आज सकाळी रवाना झाल्या. उद्योगपती मुकेश अंबानी परिवारासोबत ह्या क्रिकेट सामन्याचा मनमुराद आनंद ह्या विद्यार्थिनी घेणार आहेत. दुपारी साडेतीन वाजता होणारा मुंबई इंडियन्सचा सामना पाहणार आहेत. यामध्ये एक टीम अंबानी परिवाराची आहे. रिलायन्स फाउंडेशनच्या सहकार्याने आणि रोटरी क्लबचे अध्यक्ष गोरख बोडके यांच्या प्रयत्नांतुन विद्यार्थिनींना ही सुवर्णसंधी लाभली आहे. मोडाळे ता. इगतपुरी येथे नाशिकचे ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, द लँड अंपायरचे संचालक श्री. वायकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून विद्यार्थिनींच्या बस मुंबईकडे रवाना करण्यात आल्या. ह्या आगळ्यावेगळ्या प्रयोगाचे इगतपुरी तालुक्यात कौतुक करण्यात येत असून रिलायन्स फाउंडेशनचे मोडाळे गावकऱ्यांनी ऋण व्यक्त केले आहे.
रिलायन्स फाउंडेशनच्या सहकार्याने आणि रोटरी क्लबचे अध्यक्ष गोरख बोडके यांच्या प्रयत्नांतुन मोडाळे शाळेतील विद्यार्थिनींना हा लाभ देण्यात आला आहे. क्रिकेट सामना पाहायला येण्या जाण्यासाठी मोफत बस, मोफत तिकीट, दोन्ही वेळचे जेवण, आकर्षक टी शर्ट आदी मोफत व्यवस्था फाउंडेशनतर्फे करण्यात आली आहे. मुकेश अंबानी परिवारासोबत विद्यार्थिनींना क्रिकेट सामन्याचा मनमुराद आस्वाद लुटता येणार आहे. फक्त ग्रामीण भागातील क्रीडांगण व खेळ माहिती असणाऱ्या विद्यार्थिनींना आंतरराष्ट्रीय दर्जाचे वानखेडे स्टेडीयम, प्रसिद्ध खेळाडू जवळून पाहता येणार आहे. खेळाचे जीवनात अत्यंत महत्व असून खेळामुळे खेळाडूला किती लोकप्रियता प्राप्त होते हे प्रत्यक्ष क्रीडांगणावर पाहण्याचा क्षण अप्रतिम राहील अशी प्रतिक्रिया विद्यार्थिनींनी दिली. रिलायन्स फाउंडेशनच्या ह्या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना मिळणारा आनंद अमूल्य असल्याचे एका पालकाने सांगितले.