
इगतपुरीनामा न्यूज, दि. १३ – इगतपुरी तालुक्यात अतिशय सुंदर आणि लोकाभिमुख कामगिरी करणारे कर्तव्यदक्ष तहसीलदार परमेश्वर अंकुशराव कासुळे यांची शासनाने बदली केली आहे. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल चिटणीस ह्या महत्वाच्या पदावर त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. अर्धन्यायिक कामकाजात आघाडी, कायदा सुव्यवस्था राखण्याचे कौशल्य, जनसंपर्क यामध्ये परमेश्वर कासुळे यांनी वर्चस्व राखले. यामुळे इगतपुरी तालुक्यात कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परमेश्वर कासुळे सुप्रसिद्ध आहेत. विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी सामान्य लोकांच्या प्रश्नासाठी त्यांचा नेहमीच संपर्क होता. यापुढेही इगतपुरी तालुक्यातील लोकांशी ऋणानुबंध कायम राहील असे ते म्हणाले आहेत. इगतपुरी तहसीलदार म्हणून अद्याप पर्यंत कोणाची नियुक्ती झाली नसून शासनाकडे याबाबत निर्णय प्रलंबित आहे.
