
इगतपुरीनामा न्यूज, दि. १२ – इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुऱ्हे, नांदूरवैद्य, कुऱ्हेगाव येथील अंगणवाड्यांची पाहणी इगतपुरीचे बालविकास प्रकल्पाधिकारी पंडित वाकडे यांनी केली. याप्रसंगी पोषण आहाराचे साहित्य वाटप करण्यात आले. नियमित सकस आहार घेतल्याने शरीराचे पोषण होते. चुकीच्या आहारामुळे अनेक रोगांना सामोरे जावे लागते. उत्तम आरोग्यासाठी दररोज संतुलित आहार घेणे गरजेचे असल्याचे बालविकास प्रकल्पाधिकारी वाकडे यांनी सांगितले. त्यांनी पोषणाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या अंगणवाडी सेविकांना सूचना दिल्या. तेथील पोषण आहाराबाबत समाधान व्यक्त केले. कुपोषण निर्मूलनासह आरोग्याची काळजी घेण्याबाबत माहिती दिली. यावेळी अंगणवाडी सेविका अश्विनी संजय धोंगडे, मदतनीस रत्ना मुसळे, लक्ष्मीबाई पवार, पुंज्याबाई गव्हाणे आदी उपस्थित होते.
