पेहचान प्रगती फाउंडेशनचे आदिवासी भागातील काम कौतुकास्पद – सुप्रसिद्ध तृतीयपंथी सेलिब्रिटी पूजा शर्मा : भगतवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना विविध साहित्याचे झाले वाटप

इगतपुरीनामा न्यूज, दि. १२ – विद्यार्थ्यांसह प्रत्येक व्यक्तीने आपल्या हृदयाचा सल्ला अंमलात आणला तरच त्यांची त्या त्या क्षेत्रात प्रगती होणे शक्य आहे. सामाजिक भावनेतून करण्यात येणारी मदत दुर्बळ बनवत असल्याने त्यावर मर्यादा येतात. म्हणून यांची फलनिष्पत्ती म्हणून आगामी काळात सक्षम आणि सदृढ पिढी घडवण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे. यासाठी सर्वोत्तम योगदान पेहचान प्रगती फाउंडेशनने दिले आहे. म्हणूनच इगतपुरीच्या आदिवासी भागातील पेहचान प्रगती फाउंडेशनच्या कामाचे विशेष कौतुक झाले पाहिजे असे मनोगत सुप्रसिद्ध तृतीयपंथी सेलिब्रिटी पूजा शर्मा उर्फ रेखा यांनी केले. इगतपुरी तालुक्यातील भगतवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्य आणि खाद्यपदार्थ्यांचे वाटप झाले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात तृतीयपंथी सेलिब्रिटी पूजा शर्मा उर्फ रेखा बोलत होत्या. पेहेचान प्रगती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा प्रगती अजमेरा, मीना अग्रवाल, राधा रुंग्ठा, गुरुदेव दुहरा, पूजा गगवाणी, सरला मखरिया, प्रीती सिन्हा, लीना अगरवाल, मधू तोष्णीवाल, नीलम सेकसरिया, माया अग्रवाल, ममता डिडवानिया, मंजू बजाज, विजयालक्ष्मी दालमिया, संगीता गुप्ता, ललिता डिडवानिया, हर्षा सोनी यावेळी हजर होत्या.
राज्य आदर्श शिक्षक तथा धामडकीवाडीचे मुख्याध्यापक प्रमोद परदेशी यांनी प्रास्ताविक करून विविध कामांचा सविस्तर आढावा घेतला. विद्यार्थ्यांनी स्वागतगीत गाऊन मान्यवर महिलांची मने जिंकली. यानंतर विविध साहित्याचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले. याप्रसंगी भगतवाडी शाळेचे शिक्षक सौरभ अहिरराव, शिक्षिका वृषाली आहेर आणि ग्रामस्थ हजर होते.

स्पीडनेट इंटरनेट सोल्यूशन्स

इगतपुरी आणि घोटी मध्ये हाय स्पीड इंटरनेट, वायफाय सेवा

संपर्क साधा - 94222 14143
https://maps.google.com/?cid=8651594604110889001&entry=gps

Similar Posts

error: Content is protected !!