अवकाळीने तालुका झोडपला, पंचनामे अकरा गावचेच का ? : इंदिरा काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

इगतपुरीनामा न्यूज, दि. ११ – इगतपुरी तालुक्यात अवकाळी पावसाने गेल्या दोन महिन्यापासून कंबरडे मोडले असुन सोमवारी वादळी वाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामूळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असुन भाजीपाल्यासह पोलिओ हाऊस, शेडनेट केलेल्या शेती नेस्तनाबूत झाल्या आहेत. म्हणून सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळवुन द्यावी या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव भास्कर गुंजाळ, जेष्ठ नेते जनार्दन माळी यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देण्यात आले

मुख्यमंत्री यांचा दौरा तालुक्यात होणार असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री पाहणी दौरा करतीलही मात्र अधिकारी त्याच तत्परतेने कार्यवाही करतील का असा सवाल यावेळी विचारला जात आहे. याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष उत्तमराव भोसले, जेष्ठ नेते बाळासाहेब वालझाडे, विधानसभा अध्यक्ष किरण पागेरे, निवृत्ती कातोरे, शंकर खातळे, ज्ञानेश्वर कडू, दशरथ मालुंजकर, इगतपुरी शहराध्यक्ष संतोष सोनवणे, संतोष जगताप, गौतम गरुड, योगेश सुरूडे, चंदू किर्वे, प्रकाश पंडित आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Similar Posts

error: Content is protected !!