इगतपुरीनामा न्यूज, दि. १
मुंबई आग्रा महामार्गावर नाशिककडून मुंबईकडे जाणाऱ्या MH 15 GX 5200 ह्या चारचाकी वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीला उडवल्याने अपघात झाला. रेमंड कंपनीसमोर झलरळता ह्या अपघातात एकजण ठार झाला आहे. दुपारी दीड वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये महादू नामदेव धांडे वय 55 राहणार पाडळी देशमुख हे ठार झाले. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमीला नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जखमी व्यक्ती मयत झाल्याचे घोषित केले. वाडीवऱ्हे पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन तपास सुरू केला आहे.