पहिलवान अनिकेत झनकर याने पटकावली चांदीची गदा व रोख पारितोषिक

इगतपुरीनामा न्यूज, दि. ७ – इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा येथे आज कुस्त्यांची दंगल पार पडली. या दंगलीत गावातील पहिलवान अनिकेत संजय झनकर याने अंतिम कुस्ती स्पर्धा जिंकली. कुस्तीत विजेता ठरलेल्या अनिकेतने चांदीची गदा पटकावली. यासह सात हजार पाचशे अशी रोख पारितोषिकाची रक्कम देऊन ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी इगतपुरी तालीम संघाचे कार्याध्यक्ष पै. अविनाश सहाणे, सरपंच मालन भगवान वाकचौरे, माजी चेअरमन भाऊसाहेब झनकर, उपसरपंच त्र्यंबक डुकरे, पोलीस पाटील कचरू वाकचौरे, तंटामुक्त समिती अध्यक्ष नारायण भगत, भाजपचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब कडभाने, गणेश डुकरे, शरद वाकचौरे, माजी चेअरमन उत्तम रहाडे, शंकरराव झनकर, संदीप वाकचौरे, सतीश वाकचौरे, खंडू सूर्यवंशी, तरुण मित्र मंडळ, ग्रामस्थ उपस्थित होते.

Similar Posts

error: Content is protected !!