पाडळी देशमुख भागात ७५ लाखांची अवैध विदेशी दारू जप्त : बाराचाकी ट्रक आणि दारू असा ९० लाखांचा मुद्देमाल भरारी पथकाने घेतला ताब्यात

इगतपुरीनामा न्यूज, दि. ५

मुंबई आग्रा महामार्गावर इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख शिवारात 75 लाख रुपयांची अवैध विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. बाराचाकी ट्रक आणि विदेशी दारू असा  जवळपास 90 लाखांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने जप्त केला आहे. एमएच-40 वाय-4467 क्रमांकाचा बाराचाकी ट्रकचा चालक सचिन बाळासाहेब भोसले वय 29, रा. पोखरापूर ता. मोहोळ जि. सोलापूर या संशयिताला अटक करण्यात आली आहे. पाडळी देशमुख येथील हॉटेल पवनजवळ गस्त घालून वाहने तपासणी ही घटना रविवारी उघडकीस आली. फक्त गोवा राज्यात विक्रीची परवानगी असणारी विदेशी दारू ह्यामध्ये ताब्यात घेण्यात आली आहे. ह्या ट्रकमध्ये 15 हजार 322 विदेशी दारूच्या बाटल्या बाराचाकी ट्रक असा 89 लाख 93 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विभागीय उपआयुक्त अर्जुन ओहोळ, जिल्हा अधीक्षक शशिकांत गर्जे व उपअधीक्षक हर्षवर्धन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक एकचे निरीक्षक जयराम जाखेरे, दुय्यम निरीक्षक पी. बी. ठाकूर, राहुल राऊळ, रोहित केरीपाळे, एम. आर. तेलंगे, जवान सुनील दिघोळे, विजेंद्र चव्हाण, धनराज पवार, एम. पी. भोये, राहुल पवार, गोकुळ परदेशी, किरण कदम यांनी ही कारवाई केली.

Advt

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!