इगतपुरीनामा न्यूज, दि. ७ – भरवीर खुर्द येथील शिवाजी काजळे यांची स्वराज्य पक्षाच्या शेतकरी आघाडीच्या इगतपुरी तालुकाध्यक्षपदी निवड झाली आहे. प्रदेश संपर्कप्रमुख करण गायकर यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. विविध गावांतुन त्यांच्या निवडीचे स्वागत होत आहे. शिवाजी काजळे यांना शेतकऱ्यांच्या व्यथांची जाण असून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते नेहमी कृतिशील असतात. सरकारी नोकरीची संधी झुगारून काळ्या आईच्या सेवेसाठी त्यांनी हातात नांगर धरला. कडवा धरणग्रस्तांना नोकऱ्या द्याव्यात यासाठी त्यांनी आंदोलने आणि उपोषणे केलेली आहेत. तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून दिली आहे. भविष्यात शेतकऱ्यांसाठी तन मन धनाने भरीव कार्य करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वराज्य पक्षाचे जिल्हाप्रमुख डॉ. रुपेश नाठे, उपजिल्हाप्रमुख डॉ. महेंद्र शिरसाठ, तालुकाध्यक्ष नारायण राजे भोसले, युवा तालुकाध्यक्ष गोकुळ धोंगडे, सखाराम गव्हाणे, व्यापारी आघाडीचे नारायण जाधव, प्रभाकर कोकणे, दिलीप टोचे, गोकुळ पुंडे, बबन टोचे, अप्पा पुंडे, वैभव काजळे, रामभाऊ सारुक्ते, पोलीस पाटील, रमेश टोचे, मनोहर भोर, मुरलीधर बांडे, तुकाराम सारुक्ते, भाऊसाहेब शिंदे, गोविंद सारुक्ते, माजी सरपंच दत्तू जुंद्रे, रामदास जुंद्रे, देविदास टोचे, शिवाजी पुंडे, ज्ञानेश्वर झनकर, साहेबराव झनकर, संपत टोचे, साहेबराव टोचे, सरपंच ज्ञानेश्वर भोईर, पोलीस पाटील ज्ञानेश्वर रहाडे, बाळासाहेब सुरुडे, गणेश भदे, गणेश टोचे, देविदास शिंदे, गौरी काजळे, श्याम काजळे, धनश्री काजळे, रामदास टोचे, विकास कोकणे, भास्कर सारुक्ते, भाऊसाहेब सोनवणे, कैलास माळी आणि भरवीर खुर्द ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.