पुण्यश्लोक सदगुरू शिवपार्वती प्रतिष्ठानचे २०२२ चे 
पुरस्कार जाहीर : यंदाचा ४४ वा वार्षिक स्मृती समारोह युट्यूब चॅनलवर १७ ते २० फेब्रुवारी प्रसारित होणार

इगतपुरीनामा न्यूज, दि. २

नाशिक येथील पुण्यश्लोक सदगुरू शिवपार्वती प्रतिष्ठान यांच्यावतीने पुण्यश्लोक मातोश्री पार्वतीबाई गोसावी यांच्या ४४ व्या वार्षिक स्मृतिदिन समारोह ऑनलाईन निमित्ताने देण्यात येणारे पुरस्कार जाहीर झाले आहेत. पुण्यश्लोक सदगुरू शिवपार्वती अध्यात्मिक पुरस्कार नाशिक, येथील प. पू.  दत्तदास महाराज, दत्तधाम संस्थान नाशिक यांना तर श्रीराम पराडकर वैदिक पुरस्कार वे. शा. सं. बाळकृष्ण हरी आंबेकर ( अग्निहोत्र महाराज ) नाशिक यांना, नंदलाल जोशी वेद वेदांग पुरस्कार पंकज उंदीरवाडकर गुरुजी, नाशिक यांना,  तर सर डॉ. मो. स. तथा आप्पासाहेब गोसावी लोकसेवक पुरस्कार नाशिक येथील ॲड. जयंत जायभावे यांना तर डॉ. सुनंदा गोसावी संगीतरत्न पुरस्कार पं. डॉ. अविराज तायडे नाशिक यांना जाहीर झाले आहेत. आदर्श संस्था पुरस्कार २०२२ नाशिक येथील संस्कृत भाषा सभा, नाशिक या संस्थेला प्राप्त झाला आहे. “वैदेही” सर्जनशीलता पुरस्कार २०२२ नाशिक येथील मनिषा विवेक महाजन यांना जाहीर झाला असून, रविवार २० फेब्रुवारीला सायंकाळी ६. ३० ते ०
८. ३० या दरम्यान ऑनलाईन पध्दतीने नाशिक येथे या पुरस्कारांचा वितरण समारंभ स्वामिनी स्थितप्रज्ञानंद सरस्वती, फुलगाव, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. अशी माहिती संस्थेचे सचिव कल्पेश गोसावी यांनी दिली आहे.

याप्रसंगी अनुबंधी सोहळ्याचे आयोजन केले असून १) सौ. तारा व डॉ. उल्हास रत्नपारखी, संत साहित्याचे गाढे व्यासंगी, नाशिक  २) डॉ. सौ. रश्मी व डॉ. मनोज चोपडा, ख्यातनाम शल्यचिकित्सक मॅग्नम हॉस्पीटल नाशिक ३) सौ. सुचेता व श्री. निशिकांत अहिरे विख्यात उद्योजक नाशिक ४) सौ. सुशीला व डॉ. एस. आर. खंडेलवाल, शिक्षणतज्ज्ञ व प्राचार्य नाशिक. ५) ॲड. सौ. सोनाली व ॲड. विश्वनाथ टाळकुटे, प्रख्यात विधीज्ञ, मुंबई यांचा अनुबंधी सोहळ्यात सत्कार करण्यात येणार आहे. याप्रसंगी लेखक विद्यावाचस्पती लक्ष्मीकांत जोशी ह्यांच्या “नाथभागवतातील संतदर्शन व चिंतन”  ( शिवज्योती विशेषांक ) या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात गुणवंत व प्रज्ञावंत सौ. रूपाली देशमुख, आदिवासी आरोग्य व आर्थिक विकासक, केव्हीके, कोसबाड हिल जि. पालघर यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.  या कार्यक्रमाच्या निमित्ताने गुरुवार दि. १७ फेब्रुवारी २०२२ ते शनिवार दि. १९ फेबुवारी पर्यंत दररोज सायंकाळी  ६. ३० ते ८. ३० या दरम्यान “ज्ञानोत्तर भक्ती” या विषयावरील तीन पुष्प स्वामिनी स्थितप्रज्ञानंद सरस्वती, फुलगाव, पुणे या गुंफणार आहेत. या सुश्राव्य व्याख्यानमालेचा सर्वांनी युट्यूब चॅनल PSSP-Nashik ला भेट देवून आस्वाद घ्यावा असे आवाहन संस्थेचे प्रधान विश्वस्त डॉ. मो. स. गोसावी, अध्यक्ष श्रीमती सुप्रिया गोविंद पानसे, समन्वयक प्रा. लक्ष्मीकांत जोशी, सचिव श्री. कल्पेश गोसावी यांनी केले आहे.
                                                                                                

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!