इगतपुरी तालुक्यातील सक्तीच्या धर्मांतराविरुद्ध “स्वराज्य” संघटना उचलणार कठोर पावले : जिल्हाप्रमुख डॉ. रुपेश नाठेंच्या नेतृत्वाखाली घोटी पोलिसांना दिले निवेदन

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३० – इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुका हा आदिवासी तालुका गोरगरीब कष्टकरी आणि शेतकऱ्यांचा तालुका आहे. भात शेती, पावसाचे माहेरघर आणि निसर्गरम्य वातावरणामुळे पर्यटक इगतपुरी तालुक्याला भेट देतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून सक्तीचे हिंदू धर्मांतर होत असल्यामुळे ह्या तालुक्यात चिंता आहे. अन्य धर्मीय लोक हिंदू गावांमध्ये जाऊन त्यांच्या धर्माचा प्रसार करुन लोकांना पैसे आणि आमिष दाखवून सक्तीने धर्मांतर करायला भाग पाडत आहेत. दोन दिवसांपूर्वी “स्वराज्य”च्या मावळ्यांनी धर्मांतराचा प्रकार उधळून लावला. याबाबत आज घोटी पोलीस ठाण्यात “स्वराज्य” पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले. इगतपुरी तालुक्यामध्ये होणाऱ्या धर्मांतराविरुद्ध स्वराज्यची भूमिका जिल्हाप्रमुख डॉ. रुपेश हरिश्चंद्र नाठे यांनी स्पष्ट केली. त्यानुसार घोटी पोलिसांना स्वराज्यतर्फे निवेदन देण्यासाठी पदाधिकारी हजर होते.

यावेळी जिल्हाप्रमुख डॉ. रुपेश हरिश्चंद्र नाठे म्हणाले की, प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान असायलाच पाहिजे. परंतु जर कोणी आपल्या धर्माकडे वाकड्या नजरेने पाहत असेल तर त्याला आम्ही स्वराज्य संघटनेतर्फे निश्चितच उत्तर देऊ. धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांनी धर्मासाठी दिलेले बलिदान व्यर्थ जाऊ देता हिंदू म्हणून जन्माला आल्याचा गर्व बाळगा असे त्यांनी शेवटी सांगितले. उपजिल्हाप्रमुख डॉ. महेंद्र शिरसाठ यांनाही मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हाप्रमुख डॉ. रुपेश हरिश्चंद्र नाठे, उपजिल्हाप्रमुख डॉ. महेंद्र शिरसाठ, तालुकाप्रमुख नारायण भोसले, युवा तालुकाप्रमुख गोकुळ धोंगडे, आरोग्य – रोहीदास जाधव, विद्यार्थी – ऋतीक जाधव, तालुका उपाध्यक्ष सखाराम गव्हाणे, किरण धांडे, रोहीदास टिळे, कृष्णा गभाले, गौरव गभाले, बहिरु भोसले, राजेंद्र भोसले, पवन भोसले, अजय कश्यप, वैभव जाधव, दौलत मेमाणे, स्वप्नील गव्हाणे, हरिभाऊ वाजे, बाळु सुरुडे, गोपाळ शिंदे, सोहम धांडे, उमेश सुरुडे आदी स्वराज्याचे मावळे हजर होते.

Similar Posts

error: Content is protected !!