अचानक गाय आडवी आल्याने झालेल्या अपघातात २ गंभीर जखमी

इगतपुरीनामा न्यूज, दि. ४ – नासिकहुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मोटारसायकलला रायगडनगरजवळ अचानक गाय आडवी आल्याने अपघात झाला. मोटारसायकलने गायीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. ही घटना आज दुपारी पावणेतीन वाजता झाला. यामध्ये २ जण गंभीर जखमी आहेत. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. प्रवीण बद्री राठोड वय 35, गोकुळ दाऊ धाडी वय 46 मूळ रा. चाळीसगाव, सध्या राहणार विहितगांव नाशिक अशी जखमींची नावे आहेत.

Similar Posts

error: Content is protected !!