काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी हुकुमशाही पद्धतीने रद्दच्या निर्णयाचा तीव्र निषेध : इगतपुरी काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

इगतपुरीनामा न्यूज, दि. २७ – इगतपुरी तालुक्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशान्वये इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, मविप्रचे संचालक ॲड. संदीप गुळवे यांच्या नेतृत्वाख़ाली इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पाया रचलेली राज्यघटना आणि लोकशाही व्यवस्थेची हत्या करण्याचे षडयंत्र केंद्रातील मोदी सरकार करीत आहे. या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी इगतपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी विविध घोषणा देऊन निषेध केला. काँग्रेस कमिटीचे इगतपुरी तालुकाध्यक्ष रमेश सदाशिव जाधव, उपाध्यक्ष लकी गोवर्धने, उत्तमराव शिंदे शेतकरी नेते पांडुरंगमामा शिंदे, खरेदी विक्री संघाचे व्हॉइस चेअरमन जयराम धांडे, कचरू पाटील शिंदे, संतोष सोनवणे, रामदास बाबा मालुंजकर, सुदाम भोर, उत्तम शिंदे, नामदेव शिंदे, दिलीप जाधव, अरुण गायकर, संपत मुसळे, सुरेश धोंगडे, योगेश सहाणे, पांडुरंग कोकणे, चंदूशेठ किर्वे, प्रकाश पंडित, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जगताप आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Similar Posts

error: Content is protected !!