गावाकडची माती आणि नाती स्नेहानुबंध दृढ करते – संमेलनाध्यक्ष संजय वाघ : वाडीवऱ्हे येथे ग्रामीण साहित्य संमेलन संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – वास्तववादी साहित्य हेच खरी समाजाची प्रेरणा असते. अशा साहित्यातून समाज जीवनाला दिशा मिळत असते. आतापर्यंत ग्रामीण साहित्याने हे दिशादर्शक काम नेटाने पुढे नेण्याचे काम केले आहे. गावाकडची माती नेहमी नाती घट्ट करत असते असे मत वाडीवऱ्हे येथील इगतपुरी तालुका साहित्य मंडळ आयोजित २४ व्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष संजय वाघ यांनी व्यक्त केले. स्व. लोकनेते अण्णासाहेब कातोरे व्यासपीठावर संमेलनाचे उदघाटक डॉ. प्रशांत भरवीरकर, लेखक विजयकुमार मीठे, न्या. वसंत पाटील, रवींद्र मालुंजकर, प्रकाश कोल्हे, ऋता ठाकूर,आशा पाटील आणि स्वागताध्यक्ष बाणेश्वर मालुंजकर, साहित्य मंडळाचे अध्यक्ष पुंजाजी मालुंजकर, प्राचार्य बी. एल. वाघ उपस्थित होते. प्रारंभी विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा करत लेझीमच्या तालात ग्रंथ दिंडी काढली. उदघाटक डॉ. प्रशांत भरवीरकर, संमेलनाध्यक्ष संजय वाघ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. दिवंगत साहित्यिक शंकर बोराडे यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविकात पुंजाजी मालुंजकर यांनी गेल्या तेवीस वर्षाच्या साहित्य प्रवासाचा आढावा घेतला. यावेळी डॉ. भरवीरकर यांच्या भाषणात संत साहित्यातून जीवनाचे सार प्रकट होत असल्याचे सांगतांना बालपणातच वाचनाचे संस्कार होण्यासाठी मुले पुस्तके वाचतील यासाठी त्यांना प्रवृत्त केले पाहिजे. ज्यामुळे त्यांची क्षमता व उत्सुकता वाढीस लागेल असे सांगितले. यावेळी ऋता ठाकूर, विजयकुमार मिठे, लता पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन ॲड. ज्ञानेश्वर गुळवे, ग्रंथमित्र बाळासाहेब पलटणे यांनी केले.

कार्यक्रमात जीवन गौरव पुरस्कार भीमाबाई जोंधळे, सर्वतीर्थ पुरस्कार अलका कुलकर्णी, ज्ञानदुत पुरस्कार अतुल अहिरे, काव्यरत्न पुरस्कार अलका दराडे, दारणा पुरस्कार सदानंद भटाटे, अक्षरदूत पुरस्कार नरेंद्र पाटील, सामाजिक कृतज्ञता पुरस्कार किरण फलटणकर, ज्ञानसाधना पुरस्कार आशा पानसरे यांना प्रदान करण्यात आला. द्वितीय सत्र परिसंवादात ग्रामीण साहित्याचे बदलते स्वरूप या विषयावर विजयकुमार मिठे, सुनील गायकवाड, पुंजाजी मालुंजकर यांनी खरे साहित्य ग्रामीण भागातच समृद्ध होत असते. ग्रामीण साहित्याने नवे बदल स्वीकारून स्वतःची नवी वाट चोखाळली आहे असे सांगितले. तृतीय सत्रात खुल्या कवी संमेलनामध्ये जनार्दन पाटील, अलका कोठावदे, रवींद्र दळवी, शिवाजी शिरसागर, विद्या पाटील, रामचंद्र शिंदे, गोरख पालवे, बाळासाहेब गिरी, प्रशांत धिवंदे, राजू आतकरी, तुकाराम ढिकले, सोमनाथ साखरे, उत्तम गायकर, दत्ता देशमाने, अशोक पवार, सुभाष उमरकर, अलका कुलकर्णी, अलका दराडे, दिनेश चव्हाण, सुदर्शन पाटील, किरण सोनार, सुरेश पवार, शुभांगी पाटील, आरती डिंगोरे, आशा पाटील आदींनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन अमोल चीने, जयश्री वाघ यांनी केले. जेष्ठ साहित्यिक सावळीराम तिदमे, उपसरपंच प्रवीण मालुंजकर, सुरेश पवार, विलास पोतदार, दत्तात्रय झनकर, भीमा मालुंजकर, देवराम मराडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथमित्र बाळासाहेब फलटणे, ॲड. ज्ञानेश्वर गुळवे, रवींद्र पाटील, गोविंद डगळे, शरद मालुंजकर, सुदर्शन पाटील, सचिन सोनवणे, संपत भोर, समाधान मालुंजकर, राहुल मुसळे, श्रीयश मालुंजकर, माध्यमिक विद्यालय वाडिवऱ्हे आदींचे साहाय्य लाभले. पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

Similar Posts

error: Content is protected !!