
इगतपुरीनामा न्यूज, दि. २० – मुंबई आग्रा महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. आज सायंकाळी वाडीवऱ्हे भागातील लेकबील फाट्यावर पादचारी तरुणीला एका वाहनाने धडक दिल्याने अपघात झाला जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन तरुणीला नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तरुणी मृत झाल्याचे घोषित केले. माया मिलिंद धोंगडे वय २५ रा. कुऱ्हेगाव असे दुर्दैवी तरुणीचे नाव आहे. कुऱ्हेगाव परिसरात ह्या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.