इगतपुरीनामा न्यूज, दि. १९
इगतपुरी येथे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर जुना चेक पोस्ट नाक्यासमोर भाविकांचे श्रद्धास्थान असलेले दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे. ह्या मंदिरात शिवलिंग, शनिदेवता आणि गणपती बाप्पाच्या मूर्तींची स्थापना मोठ्या भक्तिभावाने करण्यात आली. यावेळी पहाटे अभिषेक, होमहवन करण्यात आले. दुपारी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यात ५०० भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. यावेळी मंदिराचे विश्वस्त संतोष बैरागी, गणेश बैरागी यांच्यासह सज्जन शर्मा, विकास शर्मा, बच्चू शर्मा, मुन्ना शेख, गिरीश दळवी आदींसह शिवांजली मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.