इगतपुरीनामा न्यूज, दि. ४
त्र्यंबकेश्वर येथील मविप्रच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील कु. माधुरी साबळे या विद्यार्थिनीची क. का. वाघ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चांदोरी येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयीन खो- खो स्पर्धेतुन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत आंतरविभागिय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही आंतरविभागीय स्पर्धा प्रतिक्षा कॉलेज ऑफ कॉमर्स, चिंचवड, पुणे येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. दिनेश उकिर्डे व प्रा. विक्रम पोटे यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या निवडीचे मविप्रच्या सरचिटणीस निलीमाताई पवार, अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, संचालक सचिन पिंगळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. के.शिंदे, सकाळ सत्र प्रमुख प्रा. संदीप गोसावी, डॉ. शरद कांबळे आदींनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले. त्र्यंबकेश्वर परिसरात तिचे कौतुक होत आहे.