
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथील ग्रामदैवत तसेच जागृत देवस्थान असलेल्या श्री जगदंबा मातेचा यात्रोत्सवाचे उद्या गुरुवारी 29 तारखेला आयोजन करण्यात आले आहे. भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त गावकरी मंडळी व तरुण मित्र मंडळाने केले आहे. पहाटे 4 ते 6 पर्यंत महापूजा अभिषेक, दुपारी तीन ते सात श्री जगदंबा मातेची रथातून भव्य मिरवणूक, रात्री नऊ ते बारा शकुंतला चव्हाण नगरकर यांचा लोकनाट्य तमाशा तसेच शुक्रवारी दुपारी तीन ते सहा वाजेपर्यंत कुस्त्यांची विराट दंगल असे आयोजन करण्यात आले आहे.