लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे जयंतीनिमित्त इंदिरा काँग्रेसच्या वतीने अभिवादन

इगतपुरीनामा न्यूज, दि. १

इंदिरा काँग्रेसचे नेते तथा इगतपुरी तालुक्यातील सहकारमहर्षी लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. स्व. गुळवेंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून “दादासाहेब अमर रहे” तसेच “परत या परत या दादासाहेब परत या” अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता. याप्रसंगी स्व. गोपाळराव गुळवे यांनी स्वतः आमदार खासदार न होता अनेक आमदार खासदार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. माझ्यासारख्या शेतकरी पुत्राला त्यांच्यामुळेच दोनदा आमदारकी मिळाली असल्याचे प्रतिपादन माजी आमदार शिवराम झोले यांनी केले. काँग्रेस पक्षाशी शेवटपर्यंत प्रामाणिक राहत एनएसयुआय पासून त्यांच्या विचारांवर कार्य केले. आज त्यांच्या पश्चात काँग्रेसच्या प्रदेश कमिटीपर्यंत मजल मारण्यात त्यांच्या विचारांची बांधिलकी कारणीभूत असल्याचा निर्वाळा काँग्रेसचे प्रदेश सचिव भास्कर गुंजाळ यांनी दिला.

या कार्यक्रमास जेष्ठ नेते जनार्दन माळी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामदास धांडे, जिल्हा उपाध्यक्ष उत्तमराव भोसले, बाळासाहेब कुकडे, जिल्हा चिटणीस देवराम नाठे, खरेदी विक्री संघ माजी चेअरमन सुनील जाधव, जेष्ठ नेते शांताराम कोकणे, तालुका कार्याध्यक्ष अरुण गायकर, तालुका सरचिटणीस संपतराव मुसळे, खादी ग्रामोद्योग चेअरमन बाळासाहेब वालझाडे, बाळासाहेब लंगडे, विजय गुंजाळ, दिलीप जाधव, माजी उपसभापती अर्जुन जाधव, अनु जाती महिला अध्यक्षा संध्या रोकडे, ओबीसी सेल अध्यक्ष ज्ञानेश्वर कडू, ज्ञानेश्वर खातळे, कैलास घारे, योगेश सुरुडे, युवक काँग्रेस घोटी शहराध्यक्ष सचिन तारगे, ज्ञानेश्वर कोकणे, भिका शिंदे, प्रकाश दालभगत, कैलास लकारे, सुरेश धांडे, महादू धांडे, रावसाहेब नाठे आदी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!