लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १५ – इगतपुरी तालुक्यातील कुऱ्हेगाव येथे निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराजांचे उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने व शुभप्रेरणेने रविवारी 19 मार्चला भव्य प्रदोष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी सायंकाळी पाच वाजेपासून सहा वाजेपर्यंत भव्य दिव्य ढोल ताशांच्या गजरात पालखी मिरवणूक होईल. विधी, आरती भजन यासह महंत श्री १०८ परमेश्वरगिरी महाराज व शिवभक्त ह्रदयानंद माऊली यांच्या सुमधुर आवाजात सत्संग होणार आहे.
ह्या कार्यक्रमाला भाविक भक्तांनी आणि तालुक्यातील सर्व जय बाबाजी भक्त परिवाराने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कुऱ्हेगाव येथील जय बाबाजी भक्त परिवार, आयोजक कमिटी व ग्रामस्थांनी केले आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता गावातील सर्व नागरिक तन मन धनाने प्रयत्न करीत आहे. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या दिवशी महिलांनी आपापल्या घरासमोर रांगोळी सडा टाकावा, प्रत्येकाने घरावर भगवा झेंडा लावण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. इगतपुरी तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, क्षेत्रातील सर्व भक्त परीवाराने ह्या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.