इगतपुरीनामा न्यूज, दि. १८
इगतपुरी तालुका कोरोनामुक्त होण्यासाठी करीत आलेली रोजची वाटचाल तालुक्यासाठी अत्यंत आशादायक आहे. आज सायंकाळी ५ वाजता हाती आलेल्या वैद्यकीय अहवालानुसार इगतपुरी तालुक्यात फक्त ३ नव्या व्यक्तींचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. यासह ३ कोरोना बाधित व्यक्तींनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आज दिवस अखेर तालुक्यातील सर्व कोविड सेंटरमधील एकूण रुग्णसंख्या फक्त १८ असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी दिली. दरम्यान लवकरच कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाला इगतपुरी तालुक्यात वेग येणार आहे. संभाव्य पुढच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
सध्या कोरोनाची धास्ती सर्वांनाच आहे.. अगदी कोणतेही उपचार घ्यायची लोकांची तयारी आहे, अशा परिस्थितीत किफायतशीर दरात उपलब्ध असलेलं बर्फानी आरोग्य प्लस हे आयुर्वेदिक प्रतिबंधक औषध आहे. रुग्णांसाठी बर्फानी आरोग्य प्लस म्हणजे फक्त औषध नाही, तुमच्या प्रियजणांसाठी ते सुरक्षा कवच आहे ! 7030288008