महिला दिन – केंद्रीयमंत्री डॉ. भारती पवार यांनी शेतकरी महिलांकडून भाजीपाला खरेदी करून केला महिलांचा सन्मान : वाडीवऱ्हेच्या भाजीबाजारात महिलांच्या समस्या घेतल्या जाणून

शरद मालुंजकर : इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना. डॉ. भारती पवार यांनी वाडीवऱ्हे येथे शेतकरी महिलांकडून भाजीपाला खरेदी करीत महिलांचा सन्मान केला. यावेळी त्यांनी महिलांच्या समस्या जाणून घेतल्या. तुमच्यामुळे कुटुंबाचे अस्तित्व असून आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला त्यांनी महिलांना दिला. त्यांच्या या अनोख्या कार्याचे ग्रामीण भागातील नागरिकांनी कौतुक केले आहे. इगतपुरी पंचायत समितीने मोडाळे येथे महिला दिनी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय राज्यमंत्री ना. डॉ. भारती पवार वाडीवऱ्हे येथून जात होत्या. कार्यक्रमानंतर परतांना मुख्य रस्त्याच्या कडेला शेतकरी महिला भाजीपाला विक्री करत असल्याचे त्यांना दिसले. डॉ. भारती पवार यांनी त्यांना पाहताच आपल्या वाहनातून उतरून या महिलांची अतिशय आस्थेने विचारपूस केली. यावेळी त्यांनी महिलांकडून ताजा भाजीपाला खरेदी केला. एका शेतकरी महिलेला ऐकायला कमी येत असल्याने त्यांनी तात्काळ कानाचे मशीन देण्याचे कबूल केले. त्यांनी शेतकरी महिलांची आत्मीयतेने विचारपूस केली. त्यांच्या या अनोख्या कार्याने शेतकरी महिला व नागरिक यांनी त्यांचे कौतुक केले. महिला दिनाच्या निमित्ताने महिलांकडून भाजीपाला खरेदी करीत शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या. महिलांच्या समस्या सोडविण्याचे काम करण्याची आपणास आवड असल्याचे त्यांनी सांगितले.

Similar Posts

error: Content is protected !!