इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ – मुंबई आग्रा महामार्गावर इगतपुरी जवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ४ जण जागेवरच ठार झाल्याची घटना घडली आहे. १ जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास पंढरपुरवाडी समोर नाशिकहुन मुंबईच्या दिशेने जाणारी एसेंट कार एम एच ०४ एफ ए ८२९१ ही गाडी भरगाव वेगाने जात होती. यावेळी अचानक गाडीचा पुढील टायर फुटल्याने ही कार थेट उडाली. ही कार मुंबईहुन नाशिककडे अपघातग्रस्त वॅगनर कार घेऊन जाणाऱ्या टोइंग व्हॅनवर जोरदार आदळल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात १ बालिका, १ महिला व २ पुरुष जागेवर ठार झाल्याचे समजते. इगतपुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. महामार्ग पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन कार मधील अडकलेल्या सर्व जखमींना उपचारासाठी हलवले. जगदगुरू नरेंद्राचार्य संस्थान मोफत रुग्णवाहिकेचे वाहक कैलास गतीर, टोलप्लाझा रुग्णवाहीका यांनी मदतकार्य केले. मनोरमा कौशिक वय २८, रणजीतकुमार कैलासनाथ वर्मा वय ३४, रा. खडकपाडा, ठाणे, खुशी कौशिक, वय ६, चालक कबीर राजदत्त सोनवणे, वय ३२, रा. बदलापुर हे ठार मृत्यु झाले आहे. तर अनुजसिंग हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे करीत आहे. या घटनेमुळे काही काळ वाहतुक ठप्प झाली होती मात्र घटनास्थळी पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, सहायक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे, पोलीस हवालदार संजय क्षीरसागर, सुनील खताळ, संजय गांगुर्डे, जगदीश जाधव, कैलास गोरे विक्रम लगड, महिंद्रा कंपनीची टीम यांच्यासह टोलप्लाझाचे कर्मचारी यांनी मदत करून महामार्गावरील वाहतुक सुरळीत केली.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group