“निसर्गाची कास धरा, आजारपण दूर करा” – गाव विकास समिती अध्यक्ष अनिल धांडे : रायांबे येथील शेतकऱ्यांना “सॅमसोनाईट” तर्फे गांडूळ खताचे वाटप

इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ – शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीचे प्रमाण कमी करून जास्तीत जास्त नैसर्गिक किंवा जैविक शेतीकडे वळणे काळाची गरज आहे. यासाठी भविष्यकालीन आरोग्यविषयक समस्या टाळाव्यात यासाठी इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी सॅमसोनाईट कंपनी सध्या कार्य करत आहे. या उपक्रमांतर्गत रायांबे ह्या गावात ४५ शेतकऱ्यांना गांडूळ खत तयार करण्यासाठी गांडूळ खताच्या बॅग वाटप करून प्रशिक्षण देण्यात आले. या उपक्रमात पुरूषांसोबतच महिला शेतकऱ्यांनी देखील उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शेतकऱ्यांनी ह्या उपक्रमाबद्धल सॅमसोनाईट कंपनीचे आभार मानले.

यावेळी सॅमसोनाईट कंपनीचे प्रतिनिधी विनोद सुर्यवंशी आणि पंकज महाजन ह्यांनी इगतपुरी तालुक्यातील सर्वच गरजवंत शेतकऱ्यांनी गांडूळ खत बनवून भविष्यकालीन शेतीला आणि स्वतःला आरोग्याच्या दृष्टीने सशक्त बनवावे असे सांगितले. हा सुंदर उपक्रम गावात राबविण्यासाठी गाव विकास समितीचे अध्यक्ष अनिल धांडे यांनी महिनाभरापासून गावातील शेतकऱ्यांना एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न केले. ह्या योजनेचे फायदे समजावून सांगताना “निसर्गाची कास धरा, आजारपण दूर करा” असे अनिल धांडे यांनी सांगितले. दरम्यान उपजिविका समिती अध्यक्ष दिपक धांडे, सुरेश धांडे, संदीप धांडे, राजाराम धांडे, रघुनाथ पिंगळे, संपत दोंदे, ढवळू पिंगळे, त्र्यंबक बिडवे, सरपंच शिवाजी पिंगळे, उपसरपंच कैलास धांडे, महिला समिती उज्ज्वला दोंदे, ताईबाई दोंदे आदी शेतकरी लाभार्थी यांना खताच्या बॅगा वाटप करण्यात आल्या.

Similar Posts

error: Content is protected !!