
इगतपुरीनामा न्यूज, दि. १ – मुंबई आग्रा महामार्गावर नवीन कसारा घाटात चालत्या ट्रकने पेट घेतल्याची घटना आज सकाळी घडली. दोन वेळा विझवण्याचा प्रयत्न करूनही पुन्हा हा ट्रक पेटला. यामध्ये ट्रक जळून भस्मसात झाला आहे. प्रसंगावधान राखत ट्रक चालकाने ट्रकला बाजूला लावून पलायन केल्याने त्याचा जीव वाचला. महामार्ग पोलीस केंद्र घोटी, टोल प्लाझाचे अग्निशमन दल कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. बाहेरून आग आटोक्यात आणली गेली तारी मात्र ट्रकने आतून परत आग पकडली आहे. ह्या घटनेमुळे मुंबई आग्रा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.