
इगतपुरीनामा न्यूज, दि. २८ – इगतपुरी येथील जनता विद्यालयात राजभाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नीलम बागुल होत्या. प्रमुख अतिथी म्हणून इगतपुरीचे गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील उपस्थित होते. याप्रसंगी वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून मुख्याध्यापिका नीलम बागुल, पर्यवेक्षक राजाराम पानसरे यांच्या हस्ते करण्यात आले. शिक्षक मनोगतात दत्तात्रय कुंदे यांनी कणा या कवितेचे गायन केले. गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनीही कविता गायन केले. शिक्षिका बी. एन. शेकोकार यांनी वि. वा. शिरवाडकर, त्यांचे साहित्य आणि कार्यावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका नीलम बागुल यांनी मराठी भाषा गौरव दिनाचे महत्त्व सांगितले. सूत्रसंचालन नामदेव रोंगटे यांनी तर गणेश नागरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाप्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.