
प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. २८ – शिवसेनेचे युवानेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांचे इगतपुरी तालुक्यातील पाडळी फाट्यावर जोरदार स्वागत करण्यात आले. नाशिक येथील खासदार स्वयंरोजगार मेळाव्यानिमित्त नाशिककडे जातांना खासदार श्रीकांत शिंदे, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, इगतपुरीचे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यांचा ताफा पाडळी फाट्यावर येताच फटाक्यांची अभूतपूर्व आतिषबाजी करण्यात आली. श्रीकांत शिंदे यांच्या वाहनाचा ताफा येताच पाडळी देशमुख व मुकणे ग्रामस्थांनी मोठा जल्लोष करीत फटाक्यांची आतिषबाजी केली. यावेळी जयजयकाराच्या घोषणा देण्यात आल्या. पाडळी देशमुखचे सरपंच खंडेराव धांडे, उपसरपंच बाळासाहेब आमले, मुकणेचे सरपंच हिरामण राव, उपसरपंच भास्कर राव, माजी सरपंच जयराम धांडे आदींनी खासदार श्रीकांत शिंदे यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे, गजीराम धांडे, रामभाऊ धोंगडे, दिनेश धोंगडे, रतन धांडे, लखन धांडे, ज्ञानेश्वर बोराडे, अमोल धोंगडे, गणेश राव, पुंडलिक धोंगडे, पंडीत धांडे, नितीन धांडे, बाळासाहेब धांडे, दीपक धांडे, अनिल धांडे, विवेक वारुंगसे आदींसह मुकणे व पाडळी देशमुखचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
