
इगतपुरीनामा न्यूज, दि. २८ – इगतपुरी तालुक्यातील कुऱ्हेगाव हे महत्वाचे गाव असून लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आहे. ह्या गावातील वीज मंडळाचे विद्युतवाहक खांब जीर्ण झालेले आहेत. यासह खांबांवरील तारा धोकादायक स्वरूपात जास्तच खाली येऊन लोंबकळत आहेत. यामुळे कुऱ्हेगाव ग्रामस्थ धोक्यात पडण्याची शक्यता आहे. ये जा करणाऱ्या वाहनांमुळे ह्या तारी तुटण्याची दाट शक्यता असून त्यामुळे मोठी जीवितहानी होऊ शकते. या पार्श्वभूमीवर वाडीवऱ्हे वीज मंडळ कार्यालयाने दखल घेऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी लोकनियुक्त सरपंच शिवसेना नेते भाऊसाहेब धोंगडे यांनी ग्रामस्थांच्या वतीने केली आहे. वीज मंडळाचे अभियंता श्री. आगरकर यांना निवेदन देऊन या विषयावर दीर्घ चर्चा करण्यात आली. मागण्यांचे निवेदन देतेवेळी कुऱ्हेगावचे लोकनियुक्त सरपंच शिवसेना नेते भाऊसाहेब धोंगडे, चेअरमन व ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब सुरेश धोंगडे, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन धोंगडे, ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र पवार, युवा नेते अनिल धोंगडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.