दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या नाशिक चॅप्टरकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन

इगतपुरीनामा न्यूज, दि. २७ – दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या नाशिक चॅप्टरकडून दोन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. १२ वी किंवा डिप्लोमा नंतर सीएमए करायचं असेल तर फाउंडेशनची परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा जानेवारी २०२३ मध्ये घेण्यात आली होती. त्यात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार शनिवारी सकाळच्या सत्रात करण्यात आला. सत्कार समारंभास कंट्रोलिंग क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्त्व सीएमए निलेश घुगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सीएमए निलेश घुगे यांनी प्रॅक्टिकल एप्रोच कसा असावा आणि इंडस्ट्रीत पुढे जायचे असेल तर त्यासाठी काय करावे या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

नाशिक चॅप्टर ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ( सीएमए ) चे अध्यक्ष सीएमए भूषण पागेरे यांनी सीएमए होऊन यशस्वी झालेल्या लोकांबद्दल माहिती दिली. विद्यार्थ्यांनी करिअरकडे बघण्याचा दृष्टिकोन अभ्यासक्रमाला सोपे करतो याबाबत प्रोत्साहनपर मनोगत व्यक्त केले. सीएमए भूषण पागेरे यांनी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा म्हणून व्यासपीठावर येऊन बोलण्याचे आवाहन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांचे अभ्यास करताना आलेले अनुभव व्यक्त केले. पालकांपैकी ॲड. भाऊसाहेब भोर यांनी अभिप्राय व्यक्त करून विद्यार्थ्यांना अभ्यासावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करावे यासाठी प्रेरित केले. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये समृद्धी नांदूरकर हिने प्रथम क्रमांक, श्रुती जाधव द्वितीय तर प्रथमेश बागड याने तृतीय क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल याची खात्री सीएमए भूषण पागेरे यांनी दिली. सत्कार समारंभास उपस्थित राहिल्याबद्दल प्रमुख पाहुणे प्रमुख पाहुणे, पालक आणि विद्यार्थी यांचे आभार सीएमए दिपक जगताप यांनी मानले

शनिवारी दुपारच्या सत्रात जीएसटीमधील विवाद कसे हाताळायचे या विषयावर सेमिनार घेण्यात आला. या सेमिनारमध्ये सीएमए रविंद्र देवधर, सीएमए संजय भार्गवे आणि सीएमए दिपक जोशी यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास १०० हुन अधिक सदस्यांनी सहभाग घेऊन शंका निरसन करून घेतल्या. मॅनेजिंग कमिटीचं हे शेवटचे वर्ष असून या वर्षभरात प्रिंटमीडियामध्ये सगळ्याच वृत्तपत्रांकडून बहुमूल्य सहकार्य मिळाले. सीएमए फिल्ड प्रकाशझोतात आणण्यास मदत केल्याबद्दल कृतज्ञता म्हणून पत्रकारांचा सत्कार नाशिक चॅप्टरच्या वतीने सीएमए भूषण पागेरे यांनी केला. दुपारच्या सत्राच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन टॅक्स कन्सल्टंट प्रकाश विसपुते यांनी केले.

Similar Posts

error: Content is protected !!