सुप्रसिद्ध धावपटू भाऊसाहेब बोराडे यांचे मॅरेथॉनचे शतक पूर्ण

इगतपुरीनामा न्यूज, दि. २७ – सुप्रसिद्ध धावपटू व शिवनेरी स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष माजी सैनिक भाऊसाहेब विलास बोराडे यांनी सह्याद्री फॉर्मच्या वतीने आयोजित अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये शतक पूर्ण केल्याने त्यांचे कौतुक होत आहे. भाऊसाहेब बोराडे यांनी शालेय जीवनापासून मॅरेथॉनला सुरुवात केली. त्यांनी अथक प्रयत्नातून मॅरेथॉन शतक पूर्ण केले. केंद्रीय राखीव पोलिस दलामध्ये वीस वर्षे सेवा करीत असताना तेथेही मॅरेथॉन धावत होते. अनेक मॅरेथॉनमध्ये सहभाग घेऊन त्यांनी 1995 मध्ये उत्तर महाराष्ट्राचे दोन वेळा उपविजेतेपद मिळवले आहे.

नाशिक महापौर मॅरेथॉन यामध्ये उपविजेतेपद तर ठाणे, मुंबई, दिल्ली, जळगाव, धुळे येथे मॅरेथॉन मध्ये त्यांनी सहभागी होऊन आपली यशस्वी वाटचाल पूर्ण केली. शिवनेरी स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून खेळाडूंना घडवण्याचे ध्येय पूर्ण केले. आदिवासी गरीब ग्रामीण भागात मुलांना योग्य प्रकारचे मार्गदर्शन देऊन उत्कृष्ट खेळाडू घडवण्याचे महत्वपूर्ण कार्य त्यांनी केले आहे. 2010 पासून महाराष्ट्रातील लोकप्रिय मॅरेथॉन 26/11 शहीद या नावाने त्यांनी सुरू केली. या माध्यमातून क्रीडा क्षेत्रासाठी तालुक्यातील योग्य प्रकारचे मार्गदर्शन करीत आहेत. इगतपुरी तालुक्यात दरवर्षी होणाऱ्या 26/11 शहीद मॅरेथॉन बोराडे यांनी स्वतःच्या शेतामध्ये सुरू केली. स्वखर्चाने दौंडत, उंबरकोण, उभाडे, पिंपळगाव मोर, खैरगाव, घोटी शहरातील सर्व खेळाडू मॅरेथॉनमध्ये भाग घेतात.

Similar Posts

error: Content is protected !!